दिनांक 1/10/2018 रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत ग्रामपंचायत बोर्डी आयोजित स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यात सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथील 450 विद्यार्थ्यानी समुद्र किनारपट्टीवरील प्लास्टिक कचरा उचलून स्वच्छतेचा संदेश दिला. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, गटविकास अधिकारी श्री.भरक्ष सर , गटशिक्षणाधिकारी श्री. पवार सर , पंचायत समिती सदस्य श्री. प्रशांत पाटील, बोर्डी ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रेरणा राठोड, उपसरपंच श्री.दिनेश ठाकोर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.