कबड्डी स्पर्धा बोईसर
दिनांक 6/10/2018 रोजी 14 वर्षे वयोगट मुले जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा बोईसर येथे पार पडल्या.ह्या स्पर्धेत सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी मुलांचा संघ विजयी विभागस्तरासाठी निवड झाली.
दिनांक 6/10/2018 रोजी 14 वर्षे वयोगट मुले जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा बोईसर येथे पार पडल्या.ह्या स्पर्धेत सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी मुलांचा संघ विजयी विभागस्तरासाठी निवड झाली.
दिनांक 1/10/2018 रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत ग्रामपंचायत बोर्डी आयोजित स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यात सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथील 450 विद्यार्थ्यानी समुद्र किनारपट्टीवरील प्लास्टिक कचरा उचलून स्वच्छतेचा संदेश दिला. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, गटविकास अधिकारी श्री.भरक्ष सर , गटशिक्षणाधिकारी श्री. पवार सर , पंचायत समिती सदस्य श्री. प्रशांत पाटील, बोर्डी ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रेरणा राठोड, उपसरपंच श्री.दिनेश […]
दिनांक 18 /9/2018 रोजी माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहताना सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथील मुख्याध्यापक सौ. आशा वर्तक मॅडम, विद्यार्थी व शिक्षकवृंद.
दिनांक 8/9/2018 रोजी 17 वर्षे वयोगट मुले जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा वाडा येथे पार पडल्या. सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी मुलांचा संघ उपविजयी होऊन व्दितीय क्रमांक पटकाविला.
दिनांक 5/9/2018 रोजी सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यानी शिक्षकांची भुमिका उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्प देऊन आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ह्या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.आशा वर्तक मॅडम,पर्यवेक्षक श्री. नितीन बारी सर, पर्यवेक्षिका सौ. वीणा माच्छी मॅडम उपस्थित होते
दिनांक 15/8/2018 रोजी सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथे 72 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून घोलवड गावचे सुपुत्र श्री. दिगंबर राऊत उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या विकासासाठी सतत प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे ह्या बाबत मार्गदर्शन केले. ह्यावेळी विभागीय सचिव माननीय श्री.प्राभाकर राऊत सर, शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.आशा वर्तक मॅडम, उपस्थित होते
दिनांक 14/8/2018 रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री. पंडित सर यांनी विद्यार्थ्यांना मराठी संस्कृत शब्दांचा अर्थ त्याचा योग्य वापर ह्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. ह्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.आशा वर्तक मॅडम, पर्यवेक्षक श्री. नितीन बारी सर, पर्यवेक्षिका सौ. वीणा माच्छी मॅडम उपस्थित होते.
दिनांक 13/8/2018 रोजी श्री.प्रफुल्ल व्होरा यांनी शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले.
दिनांक 28/7/2018 रोजी सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथे वृक्षारोपण करण्यात आले. ह्या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.आशा वर्तक मॅडम उपस्थित होत्या.आचार्य भिसे गुरुजीच्या समाधी जवळ तसेच बाजुच्या परीसरात विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी विविध झाडे लावली.
दिनांक 17/7/2018 रोजी पालक शिक्षक सभा घेण्यात आली. ह्या सभेत पालक प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करून शालेय व्यवस्थापन समिती,पालक -शिक्षक समिती स्थापन करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.आशा वर्तक मॅडम यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.